जगाला कमी ज्ञात असतील अशा भारताबद्दलच्या कोणत्या गोष्टी आहेत?

मी काही गोष्टी सांगतो ज्या पूर्ण जगाला काय, अर्ध्या भारतीयांना पण “भारताबद्दल” माहित नसतील.

१. एकूण १२ जोतीर्लींगापैकी सर्वांत प्रथम असलेले गुजरात मधील सोमनाथ. इथे एक अतिशय विशाल स्तंभ आहे ज्याला “बाण स्तंभ”म्हटलं आहे. ज्यावर कोरले आहे, "आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग ". ह्या बिंदुपासून जर आपण दक्षिण धृवापर्यंत एक सरळ रेषा आखली तर ती रेषा कुठल्याच जमिनीला छेदत नाही. म्हणजे त्या स्तंभापासून दक्षिण धृव्पर्यंत फक्त पाणीच आहे. आणि हे मंदिर जवळपास ७ व्या शतकातले आहे, जगाचा संपूर्ण नकाशा तयार होण्याचा कित्येक अगोदर. [1]

2. आर्यभट्ट ह्यांनी एका ठराविक तर्यापर्यंत आपली पृथ्वी स्वताभावती आणि सूर्याभोवती फिरून परत यायला किती वेळ लागतो तो मोजला होता. तो त्यांनी २३ तास, ५६ मिनिट आणि ४.०१ सेकंद असा काढला होता म्हणजे एक दिवस जवळपास. सध्याची हीच किंमत नवीन विज्ञानाने काढली ती आहे २३ तास, ५६ मिनिट आणि ४.०९१ सेकंद. तसेच पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला ३६५ दिवस, ६ तास, १२ मिनिट आणि ३० सेकंद (३६५.२५८५८ दिवस) लागतात अस त्यांनी मोजलेले. हीच किम्मत आता मोजलेल्या किंमतीपेक्षा फक्त ३ मिनिट २० सेकंद जास्त आहे. त्यांनी हे कसं मोजले असेल त्या काळात ?? [2]

३. केरळ राज्यातले हे “कोन्दिन्ही” गाव. इथे २००५ सालापासून २०१४ सालापर्यंत जुळे मुलमुली जन्माला आलेत. जवळपास २००० कुटुंबामध्ये २२० पेक्षा जास्त जुळी मुलांची जोडी आहे. आणि ती संख्या जवळपास ३३० जोड्यांपेक्षा पण जास्त आहे. आणि ही संख्या वाढतच चालली आहे. आणि आश्चर्य काय की जी मुलगी इथून लग्न करून बाहेर गावी दिली जाते तिला पण जुळी मुल होतात. [3]

४. आपले जगप्रसिद्ध मुंबई शहर, सात वेगवेगळ्या बेटांचे बनलेले आहेत. ही बेटे कोळी समाजाच्या भाषेतील शब्दांनी बनली आहेत. माहीम, वरळी, परळ, माझगांंव, बॉम्बे, लहान कुलाबा आणि कुलाबा. १६६० पर्यंत ही बेटे पोर्तुगीजांकडे होती. १६६१ मध्ये ही सर्व बेटे ईस्ट इंडिया कंपनीच्या द्वितीय चार्ल्स आणि Catherine of Braganza च्या लग्नानिमित्त पोर्तुगीजांनी हुंड्यात दिलेली. [4]

अजून खूप सारे आहेत. उत्तरला छान प्रतिसाद मिळाला की समाविष्ट करेल. :-)

संदर्भ: तळटीपा.

तळटीपा

    Comments