स्त्री : मादी नव्हे माता असते
युरोपीय चित्रकार हान्स सेबाल्ड बेहॅम (Hans Sebald Beham) यांंनी हे चित्र काढले आहे. हे बघून नक्कीच मनात चलबिचल होते ना?
ही एक कथा आहे मुलगी पेरो (pero) आणि वडील सिमोन (Simon) यांची. वडील सिमोन यांंना काही कारणास्तव उपासमारीने मरण्याची शिक्षा झाली होती. त्यांना जेलमधे मुलगी पेरोला भेटण्याची परवानगी मिळत असे. ती रोज वडीलांना भेटायला जायची. सिमोन यांची मुलगी जेव्हा त्यांना भेटायला यायची तेव्हा तिची संपूर्ण तपासणी करून नंतरच आत पाठवले जात असे. त्यामुळे ती कोणत्याही खाण्याच्या वस्तू आत घेऊन जाऊ शकत नव्हती.
खूप दिवस झाले मात्र सिमोनचा मृत्यू काही होत नाही, हे बघून जेलरला संशय आला. त्याने सिमोनवर पाळत ठेवली आणि त्याने जे पहिले ते धक्कादायक होते.
सिमोनची मुलगी पेरो त्याला स्तनपान देत होती. ज्यामुळे सिमोन जिवंत होता. ते दृष्य पाहून जेलरला त्यांची दया आली आणि त्याने सिमोनची शिक्षा माफ केली.
सांगायचा उद्देश हा की, स्त्री ही प्रसंग येईल त्याप्रमाणे काहीही करु शकते. कधी सरस्वती होऊन समाज प्रबोधन करते, तर कधी दुर्गा होऊन त्याच समाजातील तिमीर नष्ट करते. कधी जिजाऊ होऊन शिवबासारखा स्वराज्य रक्षक बनवते, तर कधी स्वत: झाशीची मणिकर्णिका होऊन स्वराज्याचे रक्षण करते. त्यामुळे तिची तुलना कोणासोबत न केलेलीच बरी!
धन्यवाद!!!
Source: Google
संकलन : सुमित रवि सरवदे
Comments
Post a Comment